कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती


उपबाजार


उपबाजार आवार समितीकडे एकूण ८ उपबाजार आहेत,
१) बडनेरा धान्य उपबाजार-समितीने नवी वस्ती बडनेरा येथे ४.३०,एकर जागा महापालिकेकडून भाड्याने घेण्यात आलेली असून या आवारावर कापूस धान्य या शेतमालाचे नियमन  करण्यात येत आहे,
२)बडनेरा गुरांचा उपबाजार--दि,०६/०४/१९९० पासून बडनेरा येथे गुरांचे बाजाराचे नियमन केलेले असून दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो,समितीने या आवारावर कार्यालय,लीलावभवन शेड्स,इलेक्ट्रिक,पाणी इत्त्यादी व्यवस्था केलेल्या आहेत,
३)भातकुली-येथे समितीस शासनाकडून ९ एकर १३ गुंठे जागा कायम लीजवर मिळाली,असून कापूस या शेतमालाचे नियमन करण्यात येते या ठिकाणी समितीचे कार्यालय लिलावभवन  तसेच काम्पौंड,पाण्याची,विद्युतची व्यवस्था स्यानीटरी अरेजमेंट,ई,व्यवस्था केलेल्या आहेत,तसेच शेतकऱ्यांचा माल ठेऊन तारण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण योजने अंतर्गत २०० मे,टन  क्षमतेच गोदामाचे बांधकाम करण्यात आलेले आहे,
४)येथे समितीचे मालकीची ८ एकर जागा असून या आवारावर तारेचे कंपाउंड कार्यालायाची इमारत लीलाव्भवन शेतमालाचे लीलावची व्यवस्था इलेक्ट्रिक स्यानीटरी अरेंजमेंट इ,प्राथमिक स्वरूपाच्या तसेच शेतकऱ्यांचा माल ठेऊन तरन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण गोदाम योजने अंतर्गत २०० मी तन क्षमतेचे गोदामाचे बांधकाम करण्यात आलेले आहे , 
५)शिराळा- येथे समितीची ७.५ एकर जागा असून तेथे या आवारावर तारेचे कम्पाउंड, कार्यालयाची इमारत, गोदाम,पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिक, लिलावभवन,  रोड्स,ई,व्यवस्था उपलब्ध आहे,तसेच शेतकऱ्यांचा माल ठेऊन तारण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण गोदाम योजने अंतर्गत २००,मे टन क्षमतेचे गोदामाचे बांधकाम करण्यात आलेले आहेत,येथे कापूस या शेतीमालाचे नियमन करण्यात येत आहे,सदर ठिकाणी अतिक्रमणाची दाट शक्यता असल्याने बाजार समिती सन २०१४-२०१५,आर्थिक वर्षात संरक्षण भिंत उभारण्यात येत असून अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे,
६)भातकुली रोड (भाजीबाजार );-
येथील जागा समितीने भातकुली रोड,अमरावती येथे खरेदी केलेली असून प्रामुख्याने त्या परिसरातील हिरवा व ताजा भाजीपालाचे नियमन केलेले असून तेथे जुने यार्डवर भाजीपाल्याचे व्यवहार स्थानांतरीत करण्याचा समितीचा मानस आहे,या आवारावर तारेचे कम्पाउंड कार्यालायाची इमारत,गोदाम,पाण्याची व्यवस्था ईलेक्ट्रिक लीलाव् भवन रोड्स,इत्यादी व्यवस्था उपलब्ध आहे,
७)माहोली  जहागीर-  समितीचे कार्यक्षेत्रात सन १९८९-९० मध्ये माहोली येथे कापूस संकलन केंद्र मंजूर झालेले आहे,तेथे समितीने स्वताच्या मालकीची ८ एकर जागा खरेदी केली असून कापूस केंद्राकरिता तात्पुरत्या स्वरूपाच्या प्राथमिक सोई उपलब्ध करून दिल्या आहेत,
८)खोलापूर ;-      खोलापूर येथे सन १९८९-९० सालात कापूस संकलन केंद्र मंजूर झाले असून समितीचे मालकी हक्काचे ८ एकर जागा घेऊन तात्पुरत्या सोई उपलब्ध केल्या आहेत,तसेच शेतकऱ्यांचा माल ठेऊन तारण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण गोदाम योजनेंतर्गत २०० मे टन क्षमतेचे गोदामाचे बांधकाम करण्यात आलेले आहे,
आठवडी बाजार;--  समितीचे कार्यक्षेत्रात वलगाव, नया  अकोला,पुसदा,शिराळा,खोलापूर,साउर,खारतळेगाव,पूर्णानगर,टाकरखेडा,गनोजा,माहोली,नांदगाव पेठ,भातकुली,आसरा,आष्टी,क्ष यावली,या ठिकाणी आठवडी बाजार ६ एप्रिल १९९० पासून समितीने नियंत्रित केलेला आहे,बडनेरा येथे गुरांच्या बाजाराकरिता सर्व सोयींनी युक्त असे आवार समितीने पूर्ण केले,