Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

या समितीचे कार्यक्षेत्रातील शेती प्रामुक्ख्याने काळी कसदार असून बरेचसे कार्यक्षेत्र बागायती सुद्धा आहे प्रामुक्ख्याने कापूस. ज्वारी. तूर.भुईमुंग सोयाबीन.चना.व काही संत्रा बागा आहेत.हि सर्व नगदी रक्कम देणारी पिके भरपूर प्रमाणात उत्पादित होतात.

या समितीने शेतकऱ्यांचे सोयीकरिता समितीचे धान्य बाजार आवार येथे ८० टनी,६० टनी,इलेक्ट्रोनिक वजन काटा बसविला आहे सदर काट्यावर शेतकर्यांचे मालाचे कोणताही मोबदला न घेता शेतकऱ्यांना वजन माप करून देण्यात येत आहे,तसेच शेतमाल चाळणी करणे करिता गाळण यंत्राची  सुविधा सुद्धा उपलब्द करून दिलेली आहे.तसेच समितीने बाजार भावाची माहिती देणेकरीता प्रोजेक्शन टि,व्ही. बसविलेला आहे,व इलेक्ट्रोनिक्स प्राइज स्टीकर बोर्ड तथा भ्रमणध्वनीद्वारे बाजार बाजारभावाचे संदेश विनमुल्ल्य माहिती शेतकऱ्यांना पुरविण्यात येत आहे,टेक्नोलॉजी मिशन ऑफ कॉटन (मिनिमिषण ३)अंतर्गत कापुसबाजार आवाराकरिता अंदाजे २.३१ कोटी रु,चा विकासप्रकल्प तयार करण्यात आलेला होता,त्या प्रमाणे प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे,या प्रकल्पाकरिता ९० लक्ष रुपये अनुदान मंजूर झालेले असून सदर अनुदानाची रक्कम सुद्धा समितीला मिळालेली आहे,समितीचे कार्यक्षेत्रात बागायती क्षेत्र असल्यामुळे शेतकरी ब-याच प्रमाणात फुलशेती करीत आहे,अशा शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्ग्य भाव मिळावा याकरिता जुने यार्डवर फुलांची खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,तसेच फुलशेती करणाऱ्या व इतर उत्पादन घेणा-या शेतकऱ्यांनी तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,तसेच बाजार समितीने फुलांचे नियमन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला  आहे,  

  १)माती व पाणी परीक्षण केंद्राची सुविधा:   अमरावती बाजार समितीचे कार्यालयात या बाजार समितीत येणा-या प्रत्येक शेतकरी घटकाला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन उत्पादकता वाढवण्याचे दृष्टीकोनातून शेतक-यांचे सुविधेकरिता कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर व अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २४,मे२०१४ पासून माती व पाणी परीक्षण करण्याची सोय बाजार समितीत उपलब्ध  करून देण्यात आलेली 

   २) विनामुल्ल्य एस. एम. एस.सुविधा ;       या बाजार समितीमध्ये प्रथमच शेतक-यांना दैनिक बाजारभावाची माहितीचा एस,एम.एस.भ्रमणध्वनि द्वारे  विनामुल्य सेवा पुरवली जात आहे,हि सेवा  दिनांक १४/०९/२०१४ पासून नियमित आजतागायत शेतक-यांना पुरविण्यात येत आहे,आजमितीस ३५५२ शेतक-यांची एस,एम,एस,सुविधेत नोंदणी झालेली असून दररोज सेवा पुरविल्या जात आहे,

३)विनामुल्य चाळणी यंत्र सुविधा::       या बाजार समिती धान्य  यार्डवर शेतक-यांचा शेतमाल चाळणी करून चांगला माल साफ करण्याकरिता चाळनियंत्र खरेदी करण्यात आलेले असून मागणी केलेल्या शेतक-यांना  विनामुल्य  सेवा पुरविली जाते

 

सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :