Agriculture Produce Market Committee, Amravati
  कृषी उत्पन्न बाजार समिती , अमरावती  

कापूस  

मुख्य बाजार आवार,
धान्य व कापूस बाजार जुने यार्डवर एकाच आवारावर कार्यरत असल्यामुळे गर्दी होत होती,म्हणून समितीने विदर्भ महाविद्यालयाचे लागत व जिनिंग प्रेसिंगचे परिसराला लागून असलेल्या शासकीय १८ एकर १७ गुंठे जागेची शासनाकडे मागणी केली,
शासनाने हि जागा २३ जून १९६६ रोजी समितीस नाममात्र वार्षिक भाडे घेऊन कायम लीजवर मंजूर केली,दि,०७/११/१९७२ पासून कापूस या शेतीमालाचे व्यवहार या आवारावर स्थलांतरित करण्यात आले,समितीने याच आवारास लागून असलेली शासकीय ३एकर २गुंठे जागा विस्ताराकरिता शासनाकडे मागणी केली असता शासनाने हि जागा रु,१. ४०,प्रती चौरस फुट दराने समितीस कायम लीजवर मंजूर केली ,सदरचे आवारावर कापूस या शेतमालाचे नियमन करण्यात येत असल्यामुळे यास नवीन कापूस बाजार म्हणून संबोधण्यात येते, जुने कापूस बाजार आवारावर धान्याची व्याप्ती वाढल्यामुळे गर्दी होत होती  म्हणून समितीने या कापूस नवीन आवारावर dhanya बाजार स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे,त्याकरिता विकास आराखडा तयार करून घेऊन त्यास मा,पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची मंजुरात प्रदान करून घेतली आहे,त्या आराखड्यानुसार बांधकाम करण्यात येउन तेथेच धान्य बाजार दि,०१/१०/१९९८ पासून स्थलांतरित करण्यात आला,सध्यस्थितीत धान्य बाजार (नवीन कापूस बाजार)हेच समितीचे मुख्यालय आहे,याच यार्डला लागून कापूस बाजाराकरिता २एकर १० गुंठे खरेदी केलेली असून त्यास समितीने टि,एम,सी,यार्द म्हणून घोषित केलेले असून सदर यार्डवर कापसाचे व्यवहार होतात,
जुने कापूस बाजार आवार,  (फळ,व,भाजीपाला विभाग)
शहराच्या मध्यवस्तीत सदर बाजार आवार आहे,त्याचे,क्षेत्र ८ एकर १४ गुंठेचे आहे सन १८७२ पासून हि जागा शानाकडून कायम पट्ट्याने मिळालेली असून त्या जागेवर कापूस बाजाराचे नियंत्रण करण्यात येत आहे,म्हणून त्यास जुने कापूस बाजार आवार म्हणून संबो धल्या  जाते,सन १९७८ पासून या आवारावर फळांचे व्यवहार सुद्धा सुरु करण्यात आलेले आहे,तसेच १९९८ पासून भाजीपाला (आलू,कांदे,मिरची,व,इतर भाजीपाला )ई,व्यवहार याच यार्डवर करण्यात येतात,लिलावासाठी ओटे शेड्स,कोन्क्रीट,प्ल्याट फॉर्म अद्त्याकरिता दुकाने गोदाम,व्यवस्था पिण्याचे पाण्याची व्यवस्था स्यानीटरी अरेजमेनट द्र्यानेज  फायर फायटिंग पोस्त,ऑफिस बँका व  शेतकरी भवन ई,व्यवस्था केलेल्या आहेत,

 

सामाजिक प्रसार
Android Application facebook tweeter linkedin
संपर्क  
Copyright © 2014. APMC Amravati, All Rights Researved.
Maintained By:Agriculture Produce Market Committee, Amravati
Developed By :