कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती


अमरावती विशेष


महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२' ते ११ ४६' उ. आणि ७६ ३८'ते ७८ २७' पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

संत नगरी अमरावती


गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते..

गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावतीजवळ माधान येथे झाला. चार महिन्यांचे असतानाच त्यांना अंधत्व आले

तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.


पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली.

अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे असे समजते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे

एकवीरा देवीचे मंदिर अंबादेवीच्या मंदिराच्या शेजारी आहे. मंदिराचे निर्माण १६६० इ.स च्या दरम्यान चे आहे.